राजकीय

हुपरीतील अतिक्रमणनाचा पेच सुटला 

Encroachment problem in Hoopari solved


By nisha patil - 6/5/2026 3:45:26 PM
Share This News:



हुपरीतील अतिक्रमणनाचा पेच सुटला 
 

हुपरी खोके धारक व खासदार आमदार तहसीलदार मुख्याधिकारी यांनी घेतली संयुक्त बैठक. हुपरी नगर परिषदेने गावातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात घेतलेला निर्णय यासाठी हातकलंगले तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हातकलंगलेचे खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने तहसीलदार सुशील बेलेकर अपर तहसीलदार महेश खिलारी मुख्याधिकारी अजय नरळे व पोलिस निरिक्षक सत्यवान हाके व गावातील खोकीधारक बजरंग दल व आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या समवेत आज बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीमध्ये  छत्रपती शिवरायांच्या  मूर्तीच्या जवळील अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू झाली व तेथील अतिक्रमण काढून त्यांना लहान गाळे देण्यासंदर्भामध्ये सांगण्यात आले व  शहरातील इतर अतिक्रमणाचा विषयी दिलेल्या नोटीसा परत घेण्याच्या सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांना दिल्या मुख्य छत्रपती शिवरायांच्या स्मारकाभोवती वीस फूट जागा उजव्या डाव्या हाताला सोडून इतर राहिलेल्या जागेमध्ये प्रत्येकाने छोटे गाळे उभा करून त्यामध्ये सर्वांना समान जागा देण्यात यावी व त्या ठिकाणी मावा गुटक्याचे पदार्थ किंवा चायनीज, चिकन असले कोणतेही पदार्थ विक्रीला ठेवू नये असे सांगत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे अशा सूचना  खासदार माने यांनी दिल्या.

बैठकीसाठी आलेल्या इतर गाळाधारकांनी झालेला निर्णय मान्य केला व 400 लोकांना दिलेल्या नोटिसा परत घेण्यासंदर्भामध्ये खासदारांनी तहसीलदार मुख्याधिकारी यांना तशा सूचना दिल्या त्यामुळे गावकऱ्यांनी बजरंग दल व अतिक्रमण केलेले गाळेधारक यांनी  छत्रपती शिवरायांच्या मूर्ती जवळच निघालेला हा तोडगा मान्य केला आहे .
 


हुपरीतील अतिक्रमणनाचा पेच सुटला 
Total Views: 3