बातम्या
विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात;
By nisha patil - 1/6/2025 12:58:00 AM
Share This News:
विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात;
प्रशासनाचा गोपनीय कारवाईचा धडाका
विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज (शुक्रवार) सकाळपासून प्रशासकीय यंत्रणेकडून मोठ्या बंदोबस्तात गोपनीय मोहिमेला सुरुवात झाली. पावसाळा तोंडावर असल्याने आणि काही ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे कारवाई पुढे ढकलली जाईल अशी अपेक्षा असतानाच आज अचानक मोहिम राबवण्यात आली.
वनविभाग, पुरातत्व विभाग आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने 12 ते 15 अतिक्रमण हटवली. मोहिमेला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाहूवाडी आणि कोल्हापूरहून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पर्यटन हंगामात चालू असलेल्या व्यावसायिकांवर या कारवाईचा मोठा परिणाम झाला. उन्हाळी सुट्टी आणि पर्यटकांची गर्दी लक्षात घेता काही व्यावसायिक अतिक्रमण कारवाई पावसाळ्यानंतर होईल असा अंदाज घेत होते. पण अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले.
गोपनीयतेतून राबवलेल्या मोहिमेमुळे केम्भूर्णी वाडी येथे पर्यटकांची वाहने थांबवण्यात आली होती, त्यामुळे गड परिसर व गजापूर भागात शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, नुकतेच नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गडावर भेट देऊन अतिक्रमणाची पाहणी केली होती.
शुक्रवार ते रविवार पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते, मात्र आजच्या कारवाईमुळे पर्यटकांची वर्दळ कमी झाली आहे.
विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात;
|