बातम्या
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरचे 15 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत
By nisha patil - 8/22/2025 2:18:49 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरचे 15 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत
साळोखेनगर (प्रतिनिधी) – शिवाजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगरच्या 15 विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यातून डाटा सायन्स विभागाचा बजरंग धामणेकर प्रथम आला आहे.
🔹 डाटा सायन्स विभाग – प्रियांका पाटील, अनिकेत माळी, अनुजा पाटील, वेदांत नाईक, सिद्धेश आग्रे, शिवानी देसाई, ऋतुजा पाटील, स्नेहल आळवेकर आणि आशुतोष जरग यांनी अनुक्रमे दुसऱ्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत स्थान पटकावले.
🔹 कॉम्प्युटर सायन्स विभाग – प्रसाद चौगुले (सहावा), साक्षी जाधव (दहावा)
🔹 सिव्हिल विभाग – शिवप्रसाद खोत (नववा), शरद टिपुगडे (दहावा)
🔹 इलेक्ट्रिकल विभाग – सलमान खोत (दहावा)
डी. वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, “गेल्या वर्षी महाविद्यालयाला मिळालेल्या नॅक मानांकनानंतर हे यश आमच्या गुणवत्तेचा पुरावा आहे.”
कॅम्पस संचालक डॉ. अभिजित माने यांनी सांगितले की, महाविद्यालयात सध्या १२०० विद्यार्थी शिक्षण घेत असून संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रगती होत आहे.
प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “गुणवत्ता हेच आमचे ब्रीद असून नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अध्यापन केल्याने विद्यार्थ्यांना यश मिळत आहे.”
या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. संजय पाटील, आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कॅम्पस संचालक डॉ. अभिजित माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरचे 15 विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत
|