बातम्या
कोल्हापुरात इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या; उज्ज्वल भवितव्यावर पडला विराम!
By nisha patil - 6/10/2025 4:22:24 PM
Share This News:
कोल्हापुरात इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या; उज्ज्वल भवितव्यावर पडला विराम!
कोल्हापूरच्या जरगनगर परिसरात 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थी गौरव सरनाईकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. शिक्षणात नेहमीच उजवा असलेला गौरव नुकताच कोल्हापूरमधील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
मात्र, घरातील छताच्या हुकाला बेडशीटने गळफास घेतल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या वडिलांनी तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून करवीर पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरभर हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापुरात इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या; उज्ज्वल भवितव्यावर पडला विराम!
|