शैक्षणिक
गुणवत्तावाढीसाठी इंग्लिश मीडियम शाळांनी अधिक प्रयत्न करावेत – पालकमंत्री
By nisha patil - 10/9/2025 11:28:37 AM
Share This News:
कोल्हापूर : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या शाळांनी केवळ संख्या वाढविण्यावर न थांबता गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशन (IMSA) कोल्हापूरतर्फे हॉटेल सयाजी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल ४९ मुख्याध्यापक व शिक्षकांना ‘IMSA Inspire Award’ देऊन गौरविण्यात आले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, "खासगी शाळांमधील शिक्षक कमी पगारातही सुटाबुटात येऊन घसा फोडून शिकवतात. त्याचप्रमाणे शासकीय शाळांतील शिक्षकांनीही अनुकरण करणे गरजेचे आहे." खासगी शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, IMSA चे राज्य सचिव प्रभाकर हेरवाडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवत्तावाढीसाठी इंग्लिश मीडियम शाळांनी अधिक प्रयत्न करावेत – पालकमंत्री
|