राजकीय
हुपरीत भाजपा-मित्रपक्षांची उत्साहपूर्ण पदयात्रा..
By nisha patil - 11/23/2025 1:26:37 PM
Share This News:
हुपरी : हुपरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढला असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये उत्साहपूर्ण पदयात्रेला सुरूवात झाली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे, उमेदवार रोहित (गोपी) शेटे व सौ. वैशाली सुतार यांच्या प्रचारासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
विकासनिश्चित नेतृत्वाला साथ देण्याचे त्यांनी आवाहन केले. नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात भाजपा-मित्रपक्षांना निर्णायक विजयाची चिन्हे दिसू लागली आहेत.
हुपरीत भाजपा-मित्रपक्षांची उत्साहपूर्ण पदयात्रा..
|