बातम्या

सीपीआरमध्ये ये जा करण्यासाठी गोदावरी इमारती जवळील प्रवेशद्वार सुरु

Entrance near Godavari Building opened to enter and exit CPR


By Administrator - 8/9/2025 5:46:18 PM
Share This News:



सीपीआरमध्ये ये जा करण्यासाठी गोदावरी इमारती जवळील प्रवेशद्वार सुरु

कोल्हापूर, दि. 8  : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील रस्त्याचे कॉक्रिटीकरण तसेच ड्रेनेजचे काम सुरु असून त्याकरिता कुंभी इमारतीजवळील प्रवेशद्वाराजवळ रस्त्याचे खोदकाम झाले असल्यामुळे हे प्रवेशद्वार बंद केले आहे.

आत व बाहेर ये- जा करण्यासाठी गोदावरी इमारती जवळील प्रवेशद्वार सुरु ठेवण्यात आले आहे. तसेच पार्किंगची दुरावस्था होऊन रुग्णसेवेमध्ये अडथळा येऊ नये याकरिता रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याखेरीज इतरांच्या वाहनांना प्रवेशाकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे. रुग्णांच्या, नातेवाईकांच्या वाहनांकरीता पार्किंगची व्यवस्था इतरत्र करावी, असे आवाहन रा.छ.शा.म. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी केले आहे.


सीपीआरमध्ये ये जा करण्यासाठी गोदावरी इमारती जवळील प्रवेशद्वार सुरु
Total Views: 87