शैक्षणिक

विवेकानंद कॉलेजमध्ये उद्योजक मेळावा संपन्न

Entrepreneur meet held at Vivekananda College


By nisha patil - 9/22/2025 3:00:45 PM
Share This News:



व्यावसायिक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे – मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे

विवेकानंद कॉलेजमध्ये उद्योजक मेळावा संपन्न

कोल्हापूर, “शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची जोड देऊन विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी सक्षम बनविण्याचे होते. त्या प्रेरणेतून आज संस्थेचे विद्यार्थी उद्योजकतेकडे वाटचाल करत आहेत, ही समाधानकारक बाब आहे,” असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.

ते विवेकानंद कॉलेजमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, दे आसरा फाउंडेशन आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालून व महाराष्ट्र राज्यगीताने झाली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त मा. जमीर करीम यांनी केले.

यावेळी मा. अजय पाटील (महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र), मा. उमेश पाटील (प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी कोल्हापूर), श्रीमती स्नेहा ननावरे (दे आसरा फाउंडेशन) यांनी मनोगत व्यक्त केले.

ग्रोथ मार्केटिंग तज्ञ श्री अनिल वाडीकर यांनी व्यवसाय निवड, व्यवस्थापकीय कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन केले. कोल्हापूरचे नामवंत उद्योजक व Advanced Engineering चे संस्थापक श्री महेश तोरगळकर यांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. युवा उद्योजकांच्या प्रश्नांना प्रमुख पाहुण्यांनी उत्तरे दिली.

आभार प्रदर्शन मा. अमोल जाधव यांनी केले.

या प्रसंगी IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, प्रा. सनी काळे, डॉ. उमेश दबडे, प्रा. डॉ. अमोल मोहिते, प्रा. आर. आर. माने, प्रा. पानसरे मॅडम, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



विवेकानंद कॉलेजमध्ये उद्योजक मेळावा संपन्न
Total Views: 71