राजकीय
"तृतीयपंथीयांचा निवडणुकीत प्रवेश?
By nisha patil - 4/11/2025 1:37:25 PM
Share This News:
कोल्हापूर:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी समाजालाही राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी कोल्हापूरमधील ‘मैत्री’ संस्थेने केली आहे. अध्यक्ष मयुरी आळवेकर, सचिव शिवानी गजबर, तसेच तृतीयपंथी समाजाचे ज्येष्ठ गुरू शिवाजीराव आळवेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की “राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरात आम्हालाही राजकारणात सहभागी होण्याची समान संधी मिळायला हवी.”
त्यांनी स्पष्ट इशारा दिला की कोणत्याही राजकीय पक्षाने तृतीयपंथी समाजाला उमेदवारीची संधी न दिल्यास ‘मैत्री’ संस्था स्वतःचे उमेदवार उभे करेल. १९६५ मध्ये देवदासी व तृतीयपंथी समाजातील बाळू चौगुले यांनी निवडणूक लढवून नवा इतिहास घडवला होता; आता तोच इतिहास पुन्हा लिहिण्याची तयारी ‘मैत्री’कडून सुरू आहे.
💬 “तृतीयपंथीयांचा आवाजही आता मतदान पेटीतून उमटणार आहे,” असा निर्धार या समाजाने व्यक्त केला आहे.
"तृतीयपंथीयांचा निवडणुकीत प्रवेश?
|