बातम्या
दाजीपूर अभयारण्यात ३० व ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी प्रवेशबंदी
By nisha patil - 12/26/2025 2:53:36 PM
Share This News:
कोल्हापूर :- राधानगरी विभागातील दाजीपूर अभयारण्यात ३० आणि ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी पूर्ण प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर येथे दरवर्षी काही लोक विनापरवाना प्रवेश करून जंगलात चुली मांडणे, प्लास्टिक, कचरा करणे, नशा करण्याचे प्रकार होतात, तसेच आग लावण्याची आणि शिकार करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
दाजीपूर अभयारण्याचे परिसर 351 चौ. किमी पसरलेले असून येथे दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचे संवर्धन केले जाते. वनविभागाचे अधिकारी सांगतात की, नववर्ष साजरा करताना पर्यावरणाचा आवाज ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी दोन दिवसासाठी प्रवेश रोखण्याची आवश्यकता भासली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल.
वनविभागाच्या संरक्षण पथकाकडून या काळात अभयारण्यात दिवस-रात्र विशेष गस्त व पहारा ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे पर्यावरणाची हानी आणि अनुचित वर्तन टाळले जाईल अशी अपेक्षा आहे. पर्यटकांनी आणि स्थानिकांनी या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दाजीपूर अभयारण्यात ३० व ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांसाठी प्रवेशबंदी
|