बातम्या

आंबेडकर नगर, तुर्केवाडी ता. चंदगड जि कोल्हापूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखेची स्थापना

Establishment of a village branch of the Bharatiya Bauddha


By nisha patil - 10/20/2026 4:08:48 PM
Share This News:



आंबेडकर नगर, तुर्केवाडी ता. चंदगड जि कोल्हापूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखेची स्थापना

पुरुष व महिला कार्यकारिणी गठीत; बौद्ध धम्माचा प्रचार, सामाजिक प्रबोधन व संघटनात्मक कार्याचा निर्धार
 

*आजरा(हसन तकीलदार): भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा चंदगड अंतर्गत आंबेडकर नगर, तुर्केवाडी येथे ग्राम शाखेची स्थापना व उदघाटन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली . यावेळी नूतन पुरुष व महिला कार्यकारिणी गठीत करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती कृष्णा कांबळे होते. स्वागताध्यक्षा म्हणून  माधुरी दिगंबर कांबळे यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे बौद्धाचार्य एकनाथ कांबळे (देवरवाडी) होते.
        यावेळी पी. डी. सरवदे  तालुका संघटक (गवसे),  वैजनाथ कांबळे (सचिव, भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा चंदगड) आणि  गणपती  कांबळे (माजी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा चंदगड) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

मार्गदर्शन करताना तालुका सचिव  वैजनाथ  कांबळे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखेचे महत्त्व आणि कार्ये विशद केली. ग्राम शाखेच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्रिशरण, पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि धम्मसंस्कार यांचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. समाजामध्ये शैक्षणिक जागृती, सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि बंधुभाव वाढविण्यासाठी ग्राम शाखेने सक्रियपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "माणसामध्ये मतभेद असले तरी एखाद्या वेळी चालतील; पण मनभेद होऊ देऊ नका." समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने, परस्पर विश्वासाने आणि बंधुभावाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा चंदगड माजी अध्यक्ष गणपती कांबळे यांनी ग्राम शाखेच्या माध्यमातून नेमके कोणते कार्य केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. केवळ शाखेची स्थापना करून न थांबता गावातील उपासक उपासिकांना संघटित करणे, धम्माचे आचरण करणे, नव्या पिढीमध्ये महापुरुषांचे विचार रुजविणे, शैक्षणिक जागृती निर्माण करणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 पी. डी. सरवदे  यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून धम्माच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत  माधुरी दिगंबर कांबळे (महिला अध्यक्षा, भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा चंदगड) यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप कांबळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी नूतन अध्यक्ष  खाचू कांबळे,उपाध्यक्ष  सुरज कांबळे,सचिव  प्रदीप कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे,कोषाध्यक्ष  प्रदीप कांबळे,संघटक दिगंबर  कांबळे, जोतिबा कांबळे, अशोक कांबळे,प्रदीप कांबळे,महिलाअध्यक्षा  संध्याकांबळे,उपाध्यक्षा  रेणुका कांबळे, सचिव  दीपाली कांबळे,कोषाध्यक्षा पूनम कांबळे,संघटक  आरती  कांबळे,  पूजा  कांबळे,अंजना  कांबळे,युवा प्रतिनिधी  सानिका  कांबळे.तसेच भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा चंदगड चे सर्व पदाधिकारी, ग्राम शाखेचे नवनियुक्त पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, सर्व उपासक व उपासिका उपस्थित होते.


आंबेडकर नगर, तुर्केवाडी ता. चंदगड जि कोल्हापूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या ग्राम शाखेची स्थापना
Total Views: 26