ताज्या बातम्या
एचएसआरपी मुदत संपली तरी कोल्हापुरातील सरकारी वाहनांवर जुने नंबर प्लेट
By nisha patil - 12/20/2025 12:22:26 PM
Share This News:
कोल्हापूर :- राज्य परिवहन विभागाने २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत दिली होती, परंतु कोल्हापूरमध्ये अनेक सरकारी मालकीची वाहने, अधिकारी सेवेतील वाहनं आणि भाड्याने घेतलेली कंत्राटी वाहने आजही जुनी नंबर प्लेटसह रस्त्यावर फिरत आहेत, असे वृत्त आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण सुमारे ९ लाख वाहनांपैकी फक्त ४,०३,३८१ वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. नोंदणी करूनही सुमारे १,३७,५६६ वाहने नंबर प्लेट बसविण्याची प्रतीक्षा करत आहेत, असे दिसतेय. यात सरकारी विभागाची वाहनेही मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यावर अद्याप नवीन सुरक्षा प्लेट लावल्या गेलेल्या नाहीत.
राज्याने हे नवीन HSRP नियम २०१९पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर लागू केले असून त्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे, पण अजूनही मोठ्या संख्येने वाहनांवर Plates बसलेले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर HSRP बसवून घ्यावे, अन्यथा १,००० रुपयांचा दंड लागू होऊ शकतो, असे स्थानिक RTO अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले आहे.
HSRP नसल्यास संबंधित वाहनांचे आरटीओ सेवा, मालमत्तेविषयक कामे आणि कर्जसंबंधी व्यवहारही होणार नाहीत, असेही अधिकारी म्हणाले. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांना आता वेळेत Plates बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एचएसआरपी मुदत संपली तरी कोल्हापुरातील सरकारी वाहनांवर जुने नंबर प्लेट
|