विशेष बातम्या

परवानगी नाकारली तरी काळा दिन ठरणार ऐतिहासिक — माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा निर्धार

Even if permission is denied


By nisha patil - 10/31/2025 4:48:19 PM
Share This News:



परवानगी नाकारली तरी काळा दिन ठरणार ऐतिहासिक — माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा निर्धार

कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारूनही १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून मूक फेरी काढण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी व्यक्त केला आहे. बेळगाव, निपाणी आणि खानापूर येथे मराठी–कन्नड वाद पुन्हा चिघळला आहे. पाच दशकांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात मराठी बांधव न्याय मिळवण्यासाठी लढत आहेत. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून २१ जानेवारी २०२६ पासून नियमित सुनावणी होणार आहे.

शिवाजी हावळाण्णाचे अध्यक्षस्थानी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी १ नोव्हेंबर रोजी संभाजी उद्यानातून मूक फेरीत सहभागी होऊन मराठी अस्मितेचा जाज्वल्य संदेश द्यावा, असे आवाहन केले. जाहीर सभेचे आयोजन मराठा मंदिरात करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले.

गजानन शहापूरकर, राहुल बोकडे, रवी जाधव, रणजीत हावळाण्णाचे, राजकुमार बोकडे आणि शशिकांत सडेकर यांनी या बैठकीत मनोगत व्यक्त केले.


परवानगी नाकारली तरी काळा दिन ठरणार ऐतिहासिक — माजी नगरसेवक नेताजी जाधव यांचा निर्धार
Total Views: 23