बातम्या
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला तरी महापालिकेचा बडगा पाळीव कुत्र्यांवरच!
By nisha patil - 12/9/2025 4:20:51 PM
Share This News:
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला तरी महापालिकेचा बडगा पाळीव कुत्र्यांवरच!
कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू असतानाच कोल्हापूर महापालिकेने पाळीव कुत्र्यांसाठी नियमावली जाहीर केली असून, त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन यांसारख्या जातींचे कुत्रे हिंस्त्र असल्याने त्यांना फिरवताना चेन, बेल्ट आणि मझल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियम न पाळल्यास थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने जाहिरातीत स्पष्ट केले आहे.
परंतु, शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना रस्त्याने जाणे अवघड झाले आहे. तरीदेखील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेकडे दुर्लक्ष करून फक्त पाळीव श्वानांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला तरी महापालिकेचा बडगा पाळीव कुत्र्यांवरच!
|