बातम्या
माजी सैनिक राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक – लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह
By nisha patil - 9/27/2025 3:14:31 PM
Share This News:
माजी सैनिक राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक – लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह
कोल्हापूर, दि. २७ “माजी सैनिक हे राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक असून त्यांचे कल्याण ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा व गुजरात क्षेत्राचे जनरल ऑफीसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह (AVSM, SM) यांनी केले.
कोल्हापूर येथील मिलिटरी स्टेशनमध्ये आयोजित माजी सैनिक रॅलीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या रॅलीत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ हजारांहून अधिक माजी सैनिक, वीर नारी, वीर माता व कुटुंबीय सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये माजी सैनिकांचा सत्कार, निवृत्ती वेतन, ईसीएचएस, सीएसडी व इतर कल्याणकारी योजनांबाबत जागृती, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, पुनर्वसन तसेच माजी सैनिक व अधिकाऱ्यांमधील संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सशस्त्र दल आणि माजी सैनिक यांच्यातील बंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला. अखेरीस माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याची प्रतिज्ञा करून कार्यक्रमाची सांगता झाली.
माजी सैनिक राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक – लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह
|