बातम्या
नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरांसाठी रविवारी परीक्षा
By nisha patil - 9/18/2025 5:42:55 PM
Share This News:
नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरांसाठी रविवारी परीक्षा
कोल्हापूर, दि. 18: 'साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात अध्यक्ष, जिल्हास्तर नियामक परिषद तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर व अध्यक्ष जिल्हास्तर कार्यकारी समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत सुरु आहे. देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य यामधील स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तींमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने निरक्षरांना शिक्षण दिले जात आहे. साक्षर करण्यात आलेल्या नवसाक्षरांची केंद्र व राज्य शासनामार्फत येत्या रविवारी, दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. ते सायं. 5 वाजता परीक्षा घेण्यात येणार असून जास्तीत जास्त नवसाक्षरांनी परीक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे.
एकूण 150 गुणांची 3 तासांची परीक्षा असून त्यामध्ये लेखन 50 गुण, वायन-50 गुण आणि संख्यज्ञान-50 गुण असतील, जिल्ह्यातील ज्या शाळेतून असाक्षरांची नोंद झालेली आहे, त्या शाळेमध्ये या दिवशी नवसाक्षरांनी उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर असाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र/गुणपत्रक देण्यात येणार आहे.
तालुकानिहाय प्रविष्ठ निरक्षर पुढीलप्रमाणे –
गडहिंग्लज- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 1802,
राधानगरी- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 1779,
भुदरगड- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 1282,
पन्हाळा- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 2795,
शाहूवाडी- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 2866,
चंदगड- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 2370,
आजरा- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 1444,
करवीर- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 2493,
हातकणंगले- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 4370,
गगनबावडा- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 611,
कागल- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 2600,
शिरोळ- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 2392,
कोल्हापूर म.न.पा.- परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य असाक्षरांची संख्या- 376
असे एकूण 27 हजार 180 निरक्षर प्रविष्ठ होणार आहेत.
नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरांसाठी रविवारी परीक्षा
|