बातम्या
राजारामपुरी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी.
By nisha patil - 5/17/2025 3:43:04 PM
Share This News:
राजारामपुरी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी.
पुणे विभागात तिसरा क्रमांक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासन लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने १०० दिवसाच्या कार्यालयीन सुधारना विशेष मोहिमेमध्ये कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलीस स्टेशनने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पुणे विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यालयीन कामात सुसूत्रता व गतिमानता आणण्याकरता शंभर दिवसांच्या कृती आराखडा राबवला होता. त्यामध्ये शून्य प्रलंबिता, स्वच्छता मोहीम, सुकर जीवनमान, नागरिकांना द्यायच्या सुविधा या बाबींचा समावेश होता. या मुद्द्यांवर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेऊन शासनाने दिलेल्या वेळेमध्ये नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले, याचबरोबर चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट सुविधा, पोलीस ठाणे परिसर स्वच्छता,गुन्हे निर्गती, मुद्देमाल निर्गती,व्यापारी उद्योजकांच्या बैठका अशा मुद्द्यांवर नियोजनबद्ध व नागरिकांशी समन्वय साधून कामगिरी केली. राज्यामध्ये पुणे विभागातील 146 पोलीस ठाण्यापैकी तिसरा क्रमांक पटकावण्याचा मान राजारामपुरी पोलीस ठाण्याने पटकवला आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, शहर डीवायएसपी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व राजारामपुरी पोलीस ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी पोलीस अंमलदारांनी पार पाडली .
राजारामपुरी पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी.
|