बातम्या

*हळोलीच्या श्रीकृष्ण महिला दूध संस्थेचे आदर्शवत कामकाज

Exemplary operations of the Shrikrishna Mahila Milk Society in Haloli


By nisha patil - 9/11/2026 7:45:28 PM
Share This News:



*हळोलीच्या श्रीकृष्ण महिला दूध संस्थेचे आदर्शवत कामकाज

*उत्पादक सभासदांना दिवाळीसाठी गोडेतेल डब्यांचे वाटप
 

*आजरा(हसन तकीलदार):-हाळोली ता. आजरा येथील श्रीकृष्ण महिला दूध संस्थेने यावर्षी दूध उत्पादक सभासदांना दीपावलीसाठी तेलाच्या डब्यांचे वितरण केल्यामुळे महागाईच्या काळात दिवाळी साजरी करण्यासाठी हातभार लागल्याची प्रतिक्रिया सभासदांनी यावेळी व्यक्त केली.
     

संस्थेला  इतर लाभातून मिळालेल्या रकमेचा लाभ उत्पादक सभासदांनाही मिळावा या उदात्त हेतूने दीपावलीचे औचित्य साधून 50 दूध उत्पादक महिला सभासदांना गोडेतेल डबे लाभांश म्हणून देण्यात आले. संस्थेमार्फत सभासदांना विविध योजनांचा लाभ संस्था स्थापनेपासून दिले जात आहेत. दीपावली, गणेश चतुर्थी तसेच गावची यात्रा या तीन मोठ्या सणाना दूध संस्थेच्या नफ्यातून सभासदांना संकलनाच्या प्रमाणात लाभांश दिला जातो.

संस्थेची वार्षिकसर्वसाधारण सभा गोकुळ आष्टमीला असते. यादिवशी संस्थेच्या स्थापनेपासून सभेदिवशी दूध उत्पादकांना भेट वस्तू द्यायची परंपरा स्थापनेपासून आजपर्यंत कायम जोपासली आहे. त्याचप्रमाणे उत्पादक महिला सभासदांना देवदर्शन किंवा पर्यटनासाठी येणारा संपूर्ण खर्च संस्थेच्या नफ्यातून केला जातो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणांचे औचित्य साधून गावाच्या शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम राबवला जातो. उत्पादक सभासदांचे एखादे दुभते जनावर दगावले तर दूध संस्थेमार्फत आर्थिक मदत म्हणून  ₹10,000/-देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
   

संस्थेचे सचिव महादेव गुरव यांच्या योग्य व नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे हे सर्व शक्य होत असलेबाबत संस्थेचे प्रवर्तक भिकाजी गुरव यांनी सांगितले.यावेळी चंदर कांबळे, दिगंबर धुरी,लक्ष्मण गुरव, राजाराम गुरव, गणपत कांबळे, सहदेव गुरव,विश्राम धुरी, गणपती अमृते, भिकाजी कांबळे, शामराव कांबळे, राजाराम धुरी, महादेव कांबळे, सुरेश तावडे, संजय गुरव, नामदेव पोवार व कर्मचारी नामदेव कांबळे यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते.


*हळोलीच्या श्रीकृष्ण महिला दूध संस्थेचे आदर्शवत कामकाज
Total Views: 8