बातम्या

लैंगिक आरोग्यावर राज्यभरातील तज्ज्ञ कोल्हापुरात एकत्र; सयाजी हॉटेलमध्ये भव्य परिषद

Experts from across the state gathered in Kolhapur on sexual health


By nisha patil - 11/12/2025 3:05:33 PM
Share This News:



लैंगिक आरोग्यावर राज्यभरातील तज्ज्ञ कोल्हापुरात एकत्र; सयाजी हॉटेलमध्ये भव्य परिषद

स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ संघ कोल्हापूर तसेच असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक अ‍ॅण्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय लैंगिकता विज्ञान परिषद हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेत ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज. ल. नागावकर आणि डॉ. शशिकांत कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे उद्घाटन शनिवार दुपारी 2 वाजता डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. राजशेखर ब-ह्मभट्ट, डॉ. टी. एस. सत्यनारायण राव, डॉ. नारायण रेड्डी आणि राज्य संघटनेचे अध्यक्ष किरण कुर्तकोटी यांच्या हस्ते होणार आहे.

लैंगिक आरोग्य, लैंगिक समस्या, गैरसमज व औषधोपचार या विविध विषयांवर डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. दीपक जुमानी, डॉ. पद्मिनी प्रसाद, डॉ. शिरीष मालदे मार्गदर्शन करणार आहेत.

रविवारी परिषदेचा समारोप होणार असून दुपारी 4.30 वाजता नागरिकांसाठी मोफत खुले चर्चासत्र घेण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. नारायण रेड्डी, डॉ. प्रसन्न गद्रे, डॉ. मानसी जैन, देवयानी एम., निरंजन मेढेकर हे लैंगिक व मानसिक समस्यांवर मार्गदर्शन करतील.

या परिषदेच्या आयोजनात कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर सायकेअ‍ॅट्रिक सोसायटी आणि कोल्हापूर युरॉलॉजिकल सोसायटी यांचे सहकार्य मिळाले आहे


लैंगिक आरोग्यावर राज्यभरातील तज्ज्ञ कोल्हापुरात एकत्र; सयाजी हॉटेलमध्ये भव्य परिषद
Total Views: 12