राजकीय
प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
By nisha patil - 11/24/2025 4:09:44 PM
Share This News:
प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
कोल्हापूर दिनांक 24 कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी महापालिकेच्या वतीने दिनांक 20 रोजी करण्यात आली आहे. या प्रारूप याद्यांवर हरकती घेण्याची मुदत 27 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. कोल्हापूर महापालिका म्हणून यावर्षी प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना झाली आहे. विधानसभा बूथ निहाय विभागणी केल्यामुळे या याद्यांमध्ये आपले नाव शोधताना मतदार गोंधळून गेला आहे.
प्रभागातील हजारो नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच एका पेक्षा जास्त मतदारांच्या हरकती घेण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक मतदाराचा वेगळा फॉर्म भरण्याचा हट्ट करण्यात येत आहे हे सुद्धा अत्यंत चुकीच आहे.
याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांना निवेदन दिले. निवेदनाच्या माध्यमातून प्रारूप मतदार याद्यांच्या हरकती घेण्यासाठी १० दिवसांची मुदतवाढ मिळावी त्याचबरोबर एका पेक्षा जास्त मतदारांच्या हरकती असल्यास सामूहिकरीत्या तक्रार अर्ज घेऊन त्यांच्या हरकती स्विकारण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचा इमेल राज्य निवडणूक आयोगाला देखील करण्यात आला आहे.
प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
|