बातम्या
फेरीवाला सर्वेक्षणाला मुदतवाढ द्या! आश्किन आजरेकरांची मनपा प्रशासनाकडे मागणी
By nisha patil - 7/10/2026 11:18:40 PM
Share This News:
फेरीवाला सर्वेक्षणाला मुदतवाढ द्या! आश्किन आजरेकरांची मनपा प्रशासनाकडे मागणी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय क्र. २ अंतर्गत सुरू असलेल्या फेरीवाला सर्वेक्षण २०२६ च्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आश्किन गणी आजरेकर यांनी केली आहे. फेरीवाला सर्वेक्षणासाठी मोठ्या संख्येने फेरीवाले कार्यालयात दाखल होत असून, अर्जाचे फॉर्म घेण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच फॉर्म भरण्यासाठी संध्याकाळी ४ वाजल्यानंतर येण्यास सांगितले जात असल्याने उपलब्ध वेळेत कागदपत्रांची तपासणी, बायोमेट्रिक नोंदणी आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अवघड होत असल्याचे आजरेकर यांनी म्हटले आहे.
या परिस्थितीमुळे अनेक पात्र फेरीवाले निर्धारित मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाहीत, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची संख्या लक्षात घेऊन अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ करावी, तसेच फॉर्म वाटपासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी आजरेकर यांनी केली आहे. फेरीवाल्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
फेरीवाला सर्वेक्षणाला मुदतवाढ द्या! आश्किन आजरेकरांची मनपा प्रशासनाकडे मागणी
|