बातम्या
कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी मुदतवाढ
By nisha patil - 8/26/2025 5:30:54 PM
Share This News:
🌾 कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी मुदतवाढ 🌾
कोल्हापूर, : कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ही मुदत २० ऑगस्ट होती.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी अशा विविध पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहेत.
अधिक माहितीसाठी तालुका व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी मुदतवाढ
|