बातम्या
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या e-KYC साठी मुदतवाढ
By nisha patil - 10/14/2025 4:50:04 PM
Share This News:
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या e-KYC साठी मुदतवाढ
सर्व्हर सुधारणा सुरू
कोल्हापूर – राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. e-KYC न केल्यास प्रति महिना मिळणारे १५०० रूपयांचे मानधन रद्द होईल. या योजनेअंतर्गत राज्यभरातील बहिणींमध्ये e-KYC करण्याची मोठी धावपळ सुरु झाली आहे, मात्र अनेक बहिणींना सर्व्हरच्या समस्या व तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करता येत नाही.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी ठाण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात सांगितले की, e-KYC सर्व्हरमध्ये सुधारणा केली जात आहे आणि २९ जिल्ह्यांतील बहिणींना नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली जाईल. पूरग्रस्त भागातील बहिणींना विशेषतः १५ दिवसांची अतिरिक्त मुदत मिळणार आहे.
आतापर्यंत अंदाजे १ कोटी १० लाखाहून अधिक महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली असून, २.५ लाखांहून अधिक महिलांची ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दररोज सरासरी ४-५ लाख बहिणींची e-KYC प्रक्रिया होत आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या e-KYC साठी मुदतवाढ
|