विशेष बातम्या

बिद्रीचे नुतन संचालक जीवन पाटील यांचा सत्कार सोहळा

Fête ceremony for Bidris new director Jeevan Patil


By nisha patil - 7/21/2025 10:18:24 PM
Share This News:



बिद्रीचे नुतन संचालक जीवन पाटील यांचा सत्कार सोहळा
 

श्री दुधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखाना, बिद्री. शासन नियुक्त संचालक म्हणून जीवन पाटील यांची निवड झाल्याबद्दल माझ्या हस्ते सत्कार सोहळा काँग्रेस कमिटीमध्ये पार पडला. त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 

यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, भारतीताई पवार, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील- चुयेकर, बिद्रीचे संचालक आर.एस. कांबळे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, सत्यजित दिनकरराव जाधव, एस. एन. पाटील, सचिन घोरपडे, युवराज गवळी, कॉ. सम्राट मोरे, अँड. संजय सरदेसाई, अनिल हळदकर, आण्णासो पाटील, विश्वजीत जाधव, भुजंगराव मगदूम, ऋषिकेश पाटील, मदन पाटील यांच्यासह सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.


बिद्रीचे नुतन संचालक जीवन पाटील यांचा सत्कार सोहळा
Total Views: 119