विशेष बातम्या
एफ.आर.पी. दरात मोडतोड — स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दालमिया साखर कारखान्यावर मोर्चा
By nisha patil - 3/11/2025 4:41:12 PM
Share This News:
एफ.आर.पी. दरात मोडतोड — स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दालमिया साखर कारखान्यावर मोर्चा
आसुर्ले–पोर्ले (प्रतिनिधी) दालमिया साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात तुटणाऱ्या ऊसाला ३६४२ रुपयांची एकरकमी पहिली उचल दिली असताना केवळ ३५२५ रुपये दर जाहीर करून एफ.आर.पी.मध्ये मोडतोड केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दालमिया कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांनीही दालमिया प्रशासनावर दबाव टाकून दर ३५२५ रुपये ठेवण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दालमिया प्रशासनाशी वाद घातला. त्यांनी जाहीर केलेला दर लेखी स्वरूपात न दिल्यास काटा बंद करण्याचा इशारा दिला.
दालमिया कारखान्यानंतर कुंभी कारखान्यानेही एफ.आर.पी.मध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रशासनाकडूनही जाहीर केलेल्या दराचे लेखी पत्र मागितले. मात्र, कारखान्याचे कार्यकारी संचालक यांनी त्यास नकार दिल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना आज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या बैठकीनंतर घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, अजित पाटील, भिमगोंडा पाटील, बाजीराव पाटील, विजय सावंत, नाथा पाटील, रामराव चेचर, दगडू गुरवळ, भैय्या थोरात, सुधाकर पाटील, बळी पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एफ.आर.पी. दरात मोडतोड — स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दालमिया साखर कारखान्यावर मोर्चा
|