बातम्या
शहरातील रास्त भाव धान्य वितरण ठप्प; दिवाळीपूर्वी ग्राहकांमध्ये नाराजी
By nisha patil - 10/17/2025 4:04:03 PM
Share This News:
शहरातील रास्त भाव धान्य वितरण ठप्प; दिवाळीपूर्वी ग्राहकांमध्ये नाराजी
कोल्हापूर – शहरातील बहुतांश रास्त भाव धान्य दुकानातून बुधवार (ता. १५) पासून सर्व्हर डाउनमुळे धान्य पुरवठा थांबला आहे. दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना धान्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. पुरवठा विभागातील रेशनकार्ड दुरुस्तीची कामेही रखडली आहेत.
सध्या फक्त ३० टक्के धान्य वाटले असून ७० टक्के वितरण झालेले नाही. नवीन बोटांचे ठसे घेणारा स्कॅनर आलेला असून त्यामुळे ठसे लवकर मिळत नाहीत, ज्यामुळे दुकानदार-ग्राहकांत वाद निर्माण होत आहेत.
शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकदाच दिले, नंतर महिन्याचे वितरण सुरू केले; ग्राहकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी सणांना आनंदाचा शिधा मिळाला, पण यंदा दिवाळीपूर्वी तोही थांबला.
सर्व्हर डाउनमुळे शिधापत्रिकेची कामेही रखडली असून नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.
शहरातील रास्त भाव धान्य वितरण ठप्प; दिवाळीपूर्वी ग्राहकांमध्ये नाराजी
|