बातम्या
गडहिंग्लजमध्ये बनावट गोवा मद्यसाठा जप्त – ८.९२ लाखांची कारवाई
By nisha patil - 7/17/2025 7:16:28 PM
Share This News:
गडहिंग्लजमध्ये बनावट गोवा मद्यसाठा जप्त – ८.९२ लाखांची कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, संशयितास अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागातील जिल्हा भरारी पथक क्रमांक ०२ (गडहिंग्लज) यांच्याकडून अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे बनावट गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा वाहतूक करणारे वाहन पकडून एकूण ₹८,९२,४४०/- किमतीचा मद्यसाठा व होंडा सिटी वाहन जप्त करण्यात आले आहे.
विशेष माहितीच्या आधारे चंदगड-गडहिंग्लज रोडवर सापळा लावून कारवाई केली. तपासणीदरम्यान आरोपी लक्ष्मण सातेरी पाटील (वय ५४, रा. बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३६ बॉक्स विविध ब्रँडच्या बनावट विदेशी मद्याचा साठा, होंडा सिटी कार (MH-02-CD-5021) व एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, हरीभाऊ लांडे, सहाय्यक निरीक्षक नरेश केरकर, तसेच जवान देवेंद्र पाटील, आशिष पोवार, आदर्श धुमाळ आणि महिला जवान ज्योती हिरे यांचा सहभाग होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.
गडहिंग्लजमध्ये बनावट गोवा मद्यसाठा जप्त – ८.९२ लाखांची कारवाई
|