बातम्या

कोल्हापूरमध्ये बनावट देशी दारू रॅकेटचा पर्दाफाश

Fake country liquor racket busted in Kolhapur


By nisha patil - 12/25/2025 1:58:38 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये बनावट देशी दारूचा मोठा रॅकेट उघडकीस आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकने रेंदाळ, तालुका हातकणंगले येथे छापा टाकून तब्बल २५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुन्या देशी दारूच्या साठ्यात पाणी व मध्यार्क मिसळून नवीन दारू तयार करून ती महाग दराने विकली जात असल्याचे तपासात उघड झाले.
या कारवाईत २६४ बॉक्स बनावट देशी दारू, १६५ बल्क लिटर मध्यार्क तसेच दोन महागड्या कार जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


कोल्हापूरमध्ये बनावट देशी दारू रॅकेटचा पर्दाफाश
Total Views: 32