बातम्या

प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Famous neurologist Dr Shirish Valsangkar commits

By nisha patil - 4/19/2025 4:57:33 PM
Share This News:

प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास आपल्या सात रस्ता परिसरातील बंगल्यात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्यांना वळसंगकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना समजताच परिसरात आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही असून पोलिस तपास सुरू आहे.

डॉ. वळसंगकर हे सोलापूरचे रहिवासी होते. त्यांनी डीबीएफ दयानंद कॉलेज, डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज, शिवाजी विद्यापीठ आणि लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून शिक्षण घेतलं होतं. ते मराठी, कन्नड, इंग्रजी व हिंदी भाषांचे जाणकार होते.

प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
Total Views: 42