बातम्या
शेतकऱ्याची बँकेसमोर गळफास घेऊन आत्महत्या...
By nisha patil - 6/19/2025 6:59:57 PM
Share This News:
शेतकऱ्याची बँकेसमोर गळफास घेऊन आत्महत्या...
मुलांच्या शिक्षणासाठी ठेवी केल्या, पण बँकेने संपवले आयुष्य!"
मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभराची कमाई छत्रपती मल्टिस्टेट बँकेत ठेवल्यानंतरही पैसे वेळेवर मिळाले नाहीत, यामुळे तणावग्रस्त झालेल्या ४६ वर्षीय सुरेश जाधव या शेतकऱ्याने गेवराईतील छत्रपती मल्टिस्टेटच्या शाखेसमोर बुधवारी (दि. १८) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुरेश जाधव (रा. गणेशनगर, गेवराई) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्नी व मुलांसह बँकेत जाऊन विनंती केली होती, परंतु व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांनी पैसे नाकारत अपमान केला. यामुळे निराश झालेल्या जाधव यांनी “माझ्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे केलेत, धन्यवाद…” असा शेवटचा संदेश पाठवून आत्महत्येचा मार्ग निवडला.
या प्रकरणानंतर बँकेचा चेअरमन संतोष ऊर्फ नाना भंडारी फरार झाला आहे. मागील सहा महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने सुरेश यांनी याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.
शेतकऱ्याची बँकेसमोर गळफास घेऊन आत्महत्या...
|