बातम्या
कोल्हापुरात शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 4/26/2025 10:04:34 PM
Share This News:
कोल्हापुरात शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
कोल्हापुरात जलसंपदा विभागाच्या वतीने "शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा" संपन्न झाली. अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी जलस्त्रोत निर्मितीबरोबरच जल व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत शेतकऱ्यांना पाणी परवाने व प्रमाणपत्रांचे वितरण झाले.
नेताजी पाटील यांनी ठिबक सिंचन व सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद केले, तर कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी पाण्याच्या कार्यक्षम वापरावर भर दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले.
कोल्हापुरात शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
|