बातम्या

शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा: कर्जमाफीच्या खोट्या आश्वासनांवर राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

Farmer suicide protest march

By nisha patil - 1/5/2025 5:34:05 PM
Share This News:

शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा: कर्जमाफीच्या खोट्या आश्वासनांवर राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात

परभणी जिल्ह्यात माळसोन्ना ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. शेतकरी सचिन जाधव व त्याच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा झाली. यावेळी राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर कर्जमाफीच्या खोट्या आश्वासनांमुळे शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप केला. फडणवीस सरकारने निवडणुकीत दिलेली कर्जमाफीची हमी तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा: कर्जमाफीच्या खोट्या आश्वासनांवर राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात
Total Views: 142