बातम्या

नागठाण्यात शेतकऱ्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला; ४५०० रुपयांची मागणी

Farmers block Pune Bengaluru highway at Nagthane


By nisha patil - 3/11/2026 3:41:55 PM
Share This News:



नागठाण्यात शेतकऱ्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला; ४५०० रुपयांची मागणी

 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठिंबा दर्शविला.
 

गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दराच्या प्रश्नावर ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. मात्र, राज्य सरकार आणि साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांकडे ठेंगा दाखविला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या हक्काच्या दरासाठी आक्रमक झाले असून, पहिली उचल ४५०० रुपये देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.


नागठाण्यात शेतकऱ्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखला; ४५०० रुपयांची मागणी
Total Views: 11