बातम्या

उसाला प्रतिटन ५००० रुपये एमएसपी व इतर पिकांना प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा ; कागल हुन हुबळीकडे शेतकऱ्यांचे प्रस्थान

Farmers demand an MSP of ₹5000 per tonne for sugarcane


By nisha patil - 9/29/2026 3:22:25 PM
Share This News:



उसाला प्रतिटन ५००० रुपये एमएसपी व इतर पिकांना प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा ; कागल हुन हुबळीकडे शेतकऱ्यांचे प्रस्थान

- कागल प्रतिनिधी : अजित बोडके कागल (प्रतिनिधी) : उसाला प्रतिटन ५००० रुपये एमएसपी (किमान आधारभूत किंमत) व इतर शेतमालाला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी रयत क्रांती संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी कागल येथून जोरदार घोषणाबाजी करीत हुबळीकडे प्रस्थान केले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा, तसेच दुधासह इतर शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त दर निश्चित करावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. सध्याच्या वाढत्या महागाईत शेती परवडेनाशी झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५००० रुपये एमएसपी जाहीर करावी व इतर शेतमालाला प्रतिलिटर ७० रुपये दर द्यावा, अशी मागणी संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे.

या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निपाणी येथून शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले. यावेळी "शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत", "ऊसाला ५००० रुपये भाव मिळालाच पाहिजे" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी रयत क्रांती संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


उसाला प्रतिटन ५००० रुपये एमएसपी व इतर पिकांना प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा ; कागल हुन हुबळीकडे शेतकऱ्यांचे प्रस्थान
Total Views: 132