बातम्या
शेतकऱ्यांची लढाई सर्वोaच्च न्यायालयात कायम – राजू शेट्टी
By nisha patil - 12/9/2025 2:55:43 PM
Share This News:
शेतकऱ्यांची लढाई सर्वोच्च न्यायालयात कायम – राजू शेट्टी
सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली – आरोप
नवी दिल्ली (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या दबावाखाली साखर कारखानदारांचे हित जपण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयात जशी जिंकली तसेच आता सर्वोच्च न्यायालयातही विजय मिळवू, अशी ठाम भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाने २०२१ चा शासन निर्णय रद्द करून एफ.आर.पी. एकरकमी देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केले. तीन वेळा सुनावणी होऊनही सरकारकडून योग्य मांडणी करण्यात आलेली नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने पुढील आठवड्यात सुनावणी नियोजित केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ॲड. योगेश पांडे, ॲड. दिलीप तौर व ॲड. अमोल देशमुख यांनी बाजू मांडली.
शेतकऱ्यांची लढाई सर्वोच्च न्यायालयात कायम – राजू शेट्टी
|