बातम्या

गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच; आंदोलनाचा २० वा दिवस

Farmers indefinite sit in protest demanding


By nisha patil - 11/17/2026 3:31:59 PM
Share This News:



 

गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच; आंदोलनाचा २० वा दिवस
 

कोल्हापूर प्रतिनिधी : अजित बोडके गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन आज विसाव्या दिवशीही सुरूच आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
 

दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसायावर परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळी सवलती व मदत मिळावी, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गेल्या वीस दिवसांपासून शेतकरी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करत असून शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

 


गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच; आंदोलनाचा २० वा दिवस
Total Views: 16