बातम्या
अंबप येथे शेतकऱ्यांस बिबटयाचे दर्शन
By nisha patil - 11/21/2025 4:02:20 PM
Share This News:
अंबप येथे शेतकऱ्यांस बिबटयाचे दर्शन
अंबप (किशोर जासूद) अंबप ता हातकणंगले येथे अंबपवाडी रस्त्यालगत असणाऱ्या बावडेकरांच्या शेतात आज गुरुवारी दुपारी मका पिकास पाणी पाजत असताना शेतमजुराला बिबट्या निदर्शनास आला. बिबट्याला पाहतात शेतकऱ्यांनी धूम ठोकली. जवळच कुत्र्याची शिकार करून त्याचे अवशेष पडल्याचे निदर्शनास आले. असून गावामध्ये भीतीचे वातावरण आहे
या घटनेची माहिती मिळताच अंबप ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाला कळविण्यात आले असता वन विभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी आले मात्र बिबट्याचा मागमुस लागला नाही ड्रोनच्या माध्यमातून जवळपास दोन तास सर्व भागातील पाहणी केली पण निदर्शनास काही आले नाही यावेळी वनविभाग अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले
वन विभाग कोल्हापूरच्या वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार,अमोल चव्हाण,मतीन बांगी, विनायक माळी यांनी अंबप येथे येऊन शोध मोहीम राबवली यावेळी विकासराव माने, उपसरपंच अशीप मुल्ला,स्वप्नील जाधव, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
अंबप येथे शेतकऱ्यांस बिबटयाचे दर्शन
|