विशेष बातम्या
बांबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 5/28/2025 5:49:59 PM
Share This News:
बांबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, : बांबू लागवडीतून उत्पन्नवाढीस मोठा फायदा होतो. शेतकऱ्यांनी बांबूचे "ब्रँड ॲम्बेसिडर" बनून जिल्ह्यात बांबू क्षेत्र वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
कणेरी मठ येथे झालेल्या बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमात काडसिद्धेश्वर स्वामीजी, कृषी विभागाचे अधिकारी व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
बांबू लागवडीसाठी शासनाकडून अनुदान दिले जात असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमात "विकसित कृषी संकल्प अभियान" चा शुभारंभही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. या अभियानात 90 गावांमध्ये कृषी रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बांबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|