बातम्या

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक आज

Farmers statewide online meeting against Shakti Peeth Highway today


By nisha patil - 8/5/2025 12:50:18 PM
Share This News:



शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक आज

कोल्हापूर, दि. ८ मे २०२५ : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज (गुरुवार) सायंकाळी ७ वाजता राज्यव्यापी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत १२ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार असून अनेक मान्यवर नेते आणि प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

बैठकीस आमदार सतेज पाटील, कैलास पाटील, अरुण लाड, रोहित आर.आर. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार नाना भिसे, संजय घाटगे, राजन क्षीरसागर, विजय देवणे, प्रकाश पाटील, राहुल देसाई, सम्राट मोरे, कृष्णात पाटील, संपत देसाई, शिवाजी मगदूम, सुई वाडकर, सुदर्शन खोत यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी होणार आहेत.

वार्तांकनासाठी पत्रकार व छायाचित्रकारांनी आज सायंकाळी ६.३० वाजता अजिंक्यतारा कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक आज
Total Views: 150