बातम्या
शक्तीपीठ विरोधात १५ ऑगस्टला शेतकरी फडकवणार तिरंगा
By nisha patil - 8/14/2025 2:35:13 PM
Share This News:
शक्तीपीठ विरोधात १५ ऑगस्टला शेतकरी फडकवणार तिरंगा
आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभिनव आंदोलन
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी “तिरंगा झळकवू शेतात – शक्तीपीठ नको आमच्या वावरात” या टॅगलाईनखाली १५ ऑगस्ट रोजी शेतात तिरंगा फडकवून अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे.
आंदोलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता आकुर्डे (ता. गारगोटी) येथील दौलत शिंदे यांच्या शेतात होणार असून, त्यानंतर सकाळी १० वाजता एकोंडी (ता. कागल) येथील शिवाजी मगदूम यांच्या शेतात, तर सकाळी ११ वाजता कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात आंदोलन होईल.
या वेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, आर. के. मोरे, शिवाजी मगदूम, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, सत्यजीत जाधव, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासो चौगुले, बयाजी शेळके, बिद्रीचे संचालक एस. आर. कांबळे, एस. बी. पाटील सर, सुयोग वाडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शक्तीपीठ विरोधात १५ ऑगस्टला शेतकरी फडकवणार तिरंगा
|