बातम्या
कागल-निढोरी मार्गावर भीषण अपघात
By nisha patil - 10/28/2025 3:47:52 PM
Share This News:
कागल-निढोरी मार्गावर भीषण अपघात
दुधाच्या टँकरखाली १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
कागल तालुक्यातील वड्डवाडी येथे दुधाच्या टँकरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला जोराची धडक दिल्याने १९ वर्षीय अजय प्रकाश वायदंडे (रा. पिंपळगाव खुर्द) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दुपारी साडेचार वाजता कागल-निढोरी राज्यमार्गावर घडली.
टँकरचालकाने रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात टँकर उजव्या बाजूला घेतल्याने समोरून आलेल्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. अपघातात अजय रस्त्यावर कोसळून जागीच ठार झाला.
घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अजय हा सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कागल-निढोरी मार्गावर भीषण अपघात
|