बातम्या
पन्हाळ्यात जागेच्या वादातून जीवघेणा हल्ला;
By nisha patil - 6/14/2025 3:28:36 PM
Share This News:
पन्हाळ्यात जागेच्या वादातून जीवघेणा हल्ला;
सचिन पाटील यांच्यावर पाच जणांचा हल्ला
पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फ बोरगाव या गावात जागेच्या वादातून एक गंभीर हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. सचिन पांडुरंग पाटील या व्यक्तीवर शेजारी राहणाऱ्या पाटील कुटुंबातील पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला.
सचिन पाटील हे आपल्या मोकळ्या जागेत बांधकाम करण्याच्या उद्देशाने एका इंजिनीयरला जागा दाखवत असतानाच, त्यांच्यावर काट्या आणि खूरप्यांसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
घटनेदरम्यान सचिन पाटील यांच्या कुटुंबातील महिलांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांना दगडांच्या ढिगाऱ्यात पाडून मारहाण सुरुच ठेवली.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अशा किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटना सातत्याने वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पन्हाळ्यात जागेच्या वादातून जीवघेणा हल्ला;
|