बातम्या
बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; करवीर तालुक्यातील संतापजनक घटना
By nisha patil - 10/25/2025 5:51:48 PM
Share This News:
बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; करवीर तालुक्यातील संतापजनक घटना
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बापाने स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडितेची आई दोन लहान मुलांसह कोल्हापूर उपनगरात वास्तव्य करत होती. ती भंगार गोळा करून मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. मात्र दिवाळीचे कारण सांगून नराधम बापाने तेरा वर्षांच्या मुलीला गावी नेले.
शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेसात वाजता आणि बुधवारी (दि. २२) पहाटे, धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
मुलीने धैर्य दाखवत आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या अमानुष घटनेनंतर महिला संघटना व सामाजिक संस्थांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; करवीर तालुक्यातील संतापजनक घटना
|