बातम्या

कारवाईची भीती दाखवत सांगलीत सायबर गुन्हेगारांनी उडवले तब्बल ४० लाख!

Fearing action


By nisha patil - 10/9/2025 11:22:13 AM
Share This News:



कारवाईची भीती दाखवत सांगलीत सायबर गुन्हेगारांनी उडवले तब्बल ४० लाख!

सांगली:- सांगलीत सायबर गुन्हेगारांनी तिघांना वेगवेगळ्या पद्धतीने तब्बल ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणांमध्ये विश्रामबाग आणि संजयनगर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.

८२ वर्षीय लक्ष्मण विठ्ठल कुलकर्णी यांना अटक वॉरंटची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल २७ लाख रुपये लंपास केले. फौजदारी गुन्हा केल्याचा खोटा आरोप करत वॉरंट टाळण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांची फसवणूक झाली.

दुसऱ्या घटनेत, एका पोलिस कर्मचाऱ्याचे मोबाईल सीमकार्ड हॅक करून त्याची माहिती दुरुपयोगासाठी वापरण्यात आली.

तर तिसऱ्या प्रकरणात मंगेश रघुनाथ पंडित यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून १० लाख रुपये उकळण्यात आले. स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या आधारकार्डाचा गैरवापर झाल्याचे सांगितले. त्यावर गुन्हा नोंद होऊ नये म्हणून १० लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे पाठवण्यास भाग पाडले. पैसे भरल्यानंतर पंडित यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या तीन प्रकरणांत सायबर गुन्हेगारांनी एकूण ४० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.


कारवाईची भीती दाखवत सांगलीत सायबर गुन्हेगारांनी उडवले तब्बल ४० लाख!
Total Views: 42