बातम्या
दिवसा घरफोडी करताना महिला चोरटी रंगेहात पकडली; ६५ हजारांचे दागिने जप्त!
By nisha patil - 11/23/2026 3:45:57 PM
Share This News:
दिवसा घरफोडी करताना महिला चोरटी रंगेहात पकडली; ६५ हजारांचे दागिने जप्त!
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत महिला चोरट्याला शेजाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. या महिलेकडून चोरीचे ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे २० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ही घटना घडली. गणपती निकम यांचे घर बंद असल्याची संधी साधून महिला आरोपीने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून सोन्याची बोरमाळ, लहान मुलांच्या अंगठ्या आणि रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिचा चोरीचा डाव उधळला आणि तिला जागीच पकडण्यात आले. सीमा ऋषिकेश ठाकूर (वय २६, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. करवीर पोलिसांनी २१ नोव्हेंबर रोजी तिला अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ही महिला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून तिच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.
दिवसा घरफोडी करताना महिला चोरटी रंगेहात पकडली; ६५ हजारांचे दागिने जप्त!
|