बातम्या
उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्रीशक्तीचा जाई पाटील : प्रेरणादायी युवा उद्योजिका
By nisha patil - 9/27/2025 5:40:35 PM
Share This News:
उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्रीशक्तीचा जाई पाटील : प्रेरणादायी युवा उद्योजिका
कोल्हापूर : शारदीय नवरात्र हा उत्सव म्हणजे निर्मितीशक्तीचा सन्मान. समाजातील अशा प्रेरणादायी महिलांपैकीच एक म्हणजे जाई जयंत पाटील, वय वर्षे अवघे २५, या युवा उद्योजिका.
रुईकर कॉलनीत राहणाऱ्या जाई पाटील यांनी कोरोना काळात टेक्नोसाय (TEKKNOSCI) नावाची कंपनी शाहुपुरीत स्थापन केली. अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षी शिकत असताना विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रयोग व कन्सेप्ट क्लिअरिंगसाठी लागणारी उपकरणे तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सुरुवातीला वित्तीय संस्थांनी नकार दिला, मात्र कोल्हापूर मार्केट यार्ड येथील इंडियन बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या मदतीने त्यांनी १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज त्यांनी यशस्वीपणे फेडले असून व्याज परतावाही मिळविला.
आज त्या आपल्या कंपनीमार्फत सुमारे ९०० ते १००० विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे देतात. वाढत्या कामामुळे त्यांनी सात जणींची टीम तयार केली असून, त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे ८ लाख रुपये इतकी आहे.
जाई पाटील म्हणतात, “आमच्या कार्याला शासनाचे अधिक पाठबळ मिळावे, जेणेकरून आणखी विद्यार्थ्यांपर्यंत ही सेवा पोहोचेल.”
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गांचा गौरव होत असताना, जाई पाटील यांचे कार्यकर्तृत्व हे स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचे व सर्जनशीलतेचे ज्वलंत उदाहरण ठरते.
उत्सव नवदुर्गांचा – सन्मान स्त्रीशक्तीचा जाई पाटील : प्रेरणादायी युवा उद्योजिका
|