बातम्या

इचलकरंजीत ईस्टर संडेचे उत्सवपूर्वक आयोजन; स्वप्निलदादा आवाडे यांच्या शुभेच्छा

Festive celebration of Easter Sunday in Ichalkaranjit


By nisha patil - 4/28/2025 1:37:57 PM
Share This News:



इचलकरंजीत ईस्टर संडेचे उत्सवपूर्वक आयोजन; स्वप्निलदादा आवाडे यांच्या शुभेच्छा

प्रभू येशूंच्या जीवनावर आधारित भावस्पर्शी नाटिकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध

इचलकरंजी येथील आवळे मैदानावर ईस्टर संडेच्या निमित्ताने रूबेन आवळे व आवळे परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी उपस्थित राहून सर्व ख्रिस्ती बांधवांना ईस्टर संडेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर आधारित एक भावस्पर्शी नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेमार्फत येशूंच्या त्याग, प्रेम आणि मानवतेच्या संदेशाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक भावूक झाले.कार्यक्रमास माजी आमदार राजीव आवळे, अरुण आवळे, इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक बाळकृष्ण पोवळे, बाजी आवळे, ललित नवनाळे, शांताराम लाखे यांच्यासह विविध मान्यवर व ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने ईस्टरचा आनंद द्विगुणीत केला.


इचलकरंजीत ईस्टर संडेचे उत्सवपूर्वक आयोजन; स्वप्निलदादा आवाडे यांच्या शुभेच्छा
Total Views: 122