बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये 30 जानेवारी रोजी पाचव्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाचे आयोजन
By Administrator - 1/27/2026 5:45:21 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये 30 जानेवारी रोजी पाचव्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाचे आयोजन
कोल्हापूर दि. 27 : साहित्य, समाज, कला आणि संस्कृती यांची सांगड घालून विविध भाषा कौशल्यांचा विकास वाड्.मय मंडळाच्या मार्फत नेहमीच होत असतो. महाविद्यालयीन युवकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेण्यासाठी आणि नवोदितांच्या सर्जनशीलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या हेतुने विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील वाड्.मय मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या वतीने शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत पाचव्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांच्या हस्ते व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभासाठी संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, आय.क्यु.ए.सी.च्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी उपस्थित राहाणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्री. किरण गुरव या सुप्रसिध्द् साहित्यिकांची मुलाखत विद्यार्थी घेणार आहेत. तर दुसऱ्या सत्रात कवितेच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी सुप्रसिध्द कवी विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचे कवी संमेलन होणार आहे. या संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे समाधीस्थळ ते कार्यक्रम स्थळ या मार्गावरील ग्रंथदिंडीने होणार आहे.
या संमेलनाचा आस्वाद जिल्हयातील साहित्यप्रेमी, रसिक , श्रोते, विचारवंतानी घ्यावा असे आवाहन विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस पी थोरात , वाड्मय मंडळ प्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले आहे.
विवेकानंद कॉलेजमध्ये 30 जानेवारी रोजी पाचव्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलनाचे आयोजन
|