बातम्या
१ मेपासून जिल्ह्यात 'कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू' अभियान
By nisha patil - 4/28/2025 8:05:54 PM
Share This News:
१ मेपासून जिल्ह्यात 'कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू' अभियान
कोल्हापूर (२८ एप्रिल) – ग्रामीण भागात स्वच्छतेचा संदेश पोहचवण्यासाठी आणि सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी, १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत 'कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू' अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
महाराष्ट्र दिनी अभियानाचा शुभारंभ होणार असून, ओला कचरा नाडेप खड्ड्यांमध्ये भरून खत निर्मिती केली जाईल. या अभियानासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे आणि समाजमाध्यमांद्वारेही मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात येणार आहे.
१ मेपासून जिल्ह्यात 'कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू' अभियान
|