बातम्या

*आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम 2025-26 चे रू. 100/- प्रमाणे अंतीम ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Final sugarcane payment for the 2025 26


By nisha patil - 10/27/2026 3:04:21 PM
Share This News:



*आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम 2025-26 चे रू. 100/- प्रमाणे अंतीम ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
 

*आजरा(हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला एफ.आर.पी. प्रमाणे देय ऊस दर रू.3194 /- असतांनाही यापूर्वी प्रतिटन रू.3400/- प्रमाणे ऊस बिल आदा केले आहे. यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेस गत हंगामावेळी आणखीन जादा प्रतिटन रू.100/- देण्याचे कारखाना संचालक मंडळाने दिलेल्या आश्वासनाचा विचार करून नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत कारखान्याचे  अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी जाहीर केले प्रमाणे येत्या दिपावली सणासाठी गतवर्षीच्या ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रतिटन रु.100/- प्रमाणे होणारी रू. 3 कोटी 6 लाख 88 हजार इतकी ऊस दराची अंतीम हप्त्याची रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणेंत आली आहे. ऊस पुरवठादार शेतक-यांनी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम उचल करावी. आजरा कारखान्याने गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाला एकूण रू.3500/- प्रति मे.टन म्हणजेच एफ.आर.पी.पेक्षा प्रतिटन रू.305/- प्रमाणे रू. 9 कोटी 36 लाख इतकी जादा रक्कम आदा केली आहे.

या वर्षीचा गळीत हंगाम सन 2026-27 करीता कारखाना  ओव्हरहोलींग करून गळीतासाठी सक्षमपणे सज्ज आहे. ऊस तोडणी वाहतुकीसाठी परजिल्हयातील व लोकल अशी 364 तोडणी यंत्रणा बांधविलेली असून या यंत्रणेमार्फत कारखान्याकडे करार केलेला संपूर्ण ऊस वेळेत उचल करून गाळप करणेचे तसेच गाळप केलेल्या ऊसाचे बिल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने वेळेत आदा करणेचे नियोजन केले आहे. तालुक्यातील व लगतच्या गडहिंग्लज, चंदगड व आंबोली भागातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आजरा साखर कारखान्यास गळीतास पाठवून कारखान्याचे 4 लाख मे.टनाचे उदिष्ट पुर्ण करण्यांस सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन  मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन  अनिल फडके,कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक  मधुकर देसाई, मारूती घोरपडे,  सुभाष देसाई, दिपक देसाई,रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक  काशिनाथ तेली,संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर,  हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर,  रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस.के.सावंत व अधिकारी उपस्थित होते.


*आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगाम 2025-26 चे रू. 100/- प्रमाणे अंतीम ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
Total Views: 26